प्राथमिक शिक्षकांची शिक्षण परिषद ऑनलाईन पध्दतीने घ्यामहिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

Santosh Avatar

Posted on :

आ.नीलेश लंके यांच्या पाठपुराव्यास यश

पारनेर(श्रीकांत चौरे):नगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची दर महिन्यास घेण्यात येणारी शिक्षण परिषद दुपारी २ ते ५ या वेळेत ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना दिले आहेत. यासंदर्भात आ. नीलेश लंके यांनी चाकणकर यांच्याशी पत्रव्यवहार करू महिला शिक्षकांची कुचंबना दूर करण्याची मागणी केली होती.
नगर जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक महिन्याला सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत शालेय कामकाज व दुपारी १ ते ५ दरम्यान शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते. त्यासंदर्भात पारनेर-नगर मतदारसंघातील महिला शिक्षिकांनी आमदार नीलेश लंके यांच्याकडे तक्रार करून सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेमुळे त्यांची कुचंबना होत असल्याचे कळविले होते. इतर जिल्हा परिषदांप्रमाणे शिक्षण परिषद ही ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी, किंवा सकाळी १०.३० ते १ शालेय कामकाज व दुपारी २ ते ५ या वेळेत शिक्षण परिषद घेण्यात यावी अशी मागणी आ. नीलेश लंके यांच्याकडे करण्यात आली होती.

आ. लंके यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी पत्रव्यवहार करून महिला शिक्षिकांची कुचंबना दूर करण्याबाबत नगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना शिक्षण परिषद ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबत निर्देश देण्याची विनंती केली होती. आ. लंके यांच्या या पत्राची चाकणकर यांनी तात्काळ दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून दुपारी २ ते ५ या वेळेत शिक्षण परिषदचे आयोजन करण्याचे निर्देश दिले.

 रक्षाबंधनाची भेट

आ. नीलेश लंके यांनी या प्रश्‍नी पाठपुरावा करून महिला शिक्षक भगिनींची कुचंबना दुर केल्याबद्दल महिला शिक्षिकांनी आ. लंके यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, हे माझे कर्तव्यच होते. आज रक्षाबंधनच्या दिवशीच योगायोगाने रूपालीताईंचे पत्र प्राप्त झाले. ही माझ्या भगिनींना रक्षाबंधनाची भेट असल्याची प्रतिक्रिया आ. लंके यांनी दिली.