जुन्नर तालुक्यात सहा वीज उपकेंद्र मंजूर करण्याची आ.अतुल बेनके यांची मागणी

Santosh Avatar

Posted on :

पुणे(प्रतिनिधी):जुन्नर तालुक्यात आर.डी.एस. एस योजनेअंतर्गत ६ ठिकाणी ३३/११ के.व्ही विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणचे पुणे परिमंडल मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग पवार म्हणाले की आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जुन्नर तालुक्यातील वीजेची समस्या सोडविण्यासाठी आर.डी.एस.एस योजनेअंतर्गत मंगरुळ,उंचखडक, व्हरुंडी (शिंदेवाडी),माणिकडोह,घाटघर,बोरी बु.या ठिकाणी ३३/११ के.व्ही विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली असल्याची माहिती पांडुरंग पवार यांनी दिली.

याप्रसंगी दत्ता लामखडे,सरपंच सचिन उंडे,माजी सरपंच सुरेश तिकोने आदी मान्यवर उपस्थित होते