निळावंती एक रहस्य चित्रपटाचे आंध्र प्रदेश मध्ये  प्रमोशन

Santosh Avatar

Posted on :

श्रीकांत चौरे(प्रतिनिधी):मराठी बरोबरच इतर चार भाषेत डब होत असलेल्या निळावंती एक रहस्य या चित्रपटाचे प्रमोशन ३ जुलै ते १० जुलै या कालावधीत तिरुमला,हैद्राबाद मधील काही शहरात करण्यात आले.
हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत लवकरच प्रदर्शित केला जाणार असून भारतामधील इतर भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे. पण या निळावंती गहन विषयावर हात घातलेल्या चित्रपटाला इतर राज्यांमध्येही तेथील लोकांचे , प्रेक्षकांचे काय मत आहे. आणि निळावंती सारख्या विषयाला इतर राज्यातून कसा प्रतिसाद मिळू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी चित्रपटाच्या २७ लोकांच्या टीमने आंध्र प्रदेश मधील तिरुमला , हैद्राबाद अश्या अनेक शहरांमधील कॉलेज , सार्वजनिक पार्क , धार्मिक स्थळे आश्रम इत्यादी ठिकाणी ७ दिवस प्रमोशन केले. निळावंती विषयाच्या उलगड्याची जेवढी महाराष्ट्रातील जनतेला आतुरता आहे तेवढीच इतरही राज्यांमध्ये आहे असे यातून जाणवले गेले. त्यामुळे पिकवण्याबरोबरच खपवण्याचाही चांगला विचार वेगवेगळ्या माध्यमातून केला पाहिजे या उद्देशाने आमचे प्रयत्न सुरू आहेत असे चित्रपटाच्या टीमच्या वतीने सांगण्यात येत आहे.